बल्लारशाह शहरात आज जिजाऊ रथयात्रेचे आगमन-स्वागतासाठी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे संभाजी ब्रिगेड चे आव्हान

Thu 10-Apr-2025,08:51 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारशाह: गेल्या पस्तीस वर्षांपासून शिव फुले शाहू आंबेडकर या आपल्या धरोहरांचा वारसा जपत मराठा सेवा संघ ही पुरोगामी चळवळ समता बंधुता व न्यायावर आधारीत समाजव्यवस्था आपल्या तेहतीस कक्षाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आली आहे.जिजाऊ रथयात्रेची सुरुवात १८ मार्च २०२५ ला शहाजी राजे भोसले यांचे जन्मस्थळ वेरुळ पासून झाली असुन सांगता १ मे २०२५ ला पुणे येथील लाल महालात होणार आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ठिकठिकाणी जिजाऊ रथयात्रेच्या स्वागताला जनतेचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बल्लारशाह शहरात दिनांक ११ एप्रिल २०२५ रोज शुक्रवार ला सकाळी १०:३० ला जिजाऊ रथयात्रेचे आगमन होत आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे .असे आव्हान संभाजी ब्रिगेड बल्लारशाह च्या वतीने करण्यात आले आहे.